N1Live Entertainment आलिया भट्टचाही डीपफेक व्हिडीओ चर्चेत; स्लीव्हलेस टॉपमध्ये अश्लील हावभाव करताना दिसली अभिनेत्री
Entertainment

आलिया भट्टचाही डीपफेक व्हिडीओ चर्चेत; स्लीव्हलेस टॉपमध्ये अश्लील हावभाव करताना दिसली अभिनेत्री

Alia Bhatt's deepfake video discussed; Delhi actress making obscene gestures in sleeveless top

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन अधिक सुकर झालं असलं तरी यामुळे बऱ्याच प्रमाणात धोकादेखील निर्माण झाला आहे. खासकरून सेलिब्रिटीजसाठी हा खूप मोठा धोका आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ’ने चांगलीच खळबळ उडवली होती. मूळ व्हिडिओमध्ये ब्रिटिश भारतीय मुलगी ‘झारा पटेल’ होती, परंतु तिच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

रश्मिकापाठोपाठ क्रीती सेनॉन, काजोल यांचाही असाच डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. आता यांच्यापाठोपाठ बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळे याबद्दल आणखी चर्चा वाढली आहे. व्हिडिओमध्ये tत्या मुलीने फ्लोरल प्रिंटचा स्लीव्हलेस टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. व्हिडिओमध्ये ती बेडवर क्लीवेज दाखवताना दिसत आहे.
इतकंच नव्हे तर ती काही अश्लील हावभाव करतानाही दिसत आहे. त्या मुलीच्या चेहऱ्याच्या जागी आलिया भट्टचा चेहेरा वापरण्यात आला आहे. अर्थात हा व्हिडीओ फेक आहे हे तो पाहताक्षणीच ध्यानात येत आहे, पण तरी काही लोक हा व्हिडीओ पाहून गोंधळून जाऊ शकतात. हा डीपफेक व्हिडीओ ‘पॉजशूटर’ नावाच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटने शेअर केला आहे. अद्याप याचं मूळ स्त्रोत काय आहे याची माहिती समोर आलेली नाही.

आलिया भट्टच्या व्हायरल होणाऱ्या या डीपफेक व्हिडीओमुळे मात्र सायबर सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून १९ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता लवकरच आलिया भट्टच्या व्हिडीओ प्रकरणावरही त्वरित कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. केवळ रश्मिका, काजोल किंवा आलियाच नव्हे तर सारा तेंडुलकर, शुभमन गील, कतरिना कैफ यांचेदेखील फोटोज आणि व्हिडीओज मध्यंतरी व्हायरल झाले होते.

Exit mobile version